In reply to
बृहन्मुंबई महानगरपालिका आर/दक्षिण विभागामार्फत ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त कांदिवली येथील चारकोप सेक्टर १ आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. (१/२)
या शिबिरामध्ये नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी तसेच वैद्यकीय सल्ला व आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. एकूण १४२ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. (२/२) #MyBMCUpdates