Ward H EAST / Tweet
SU
Suryakant Sulochana Gangaram chawan(Ex.Mun.Counci)
@SuryakantChawa1

अपघात व जीवित हानी झाल्यावरच कार्यवाही करणार का ! मनपा प्रशासनाचा अनुद्यापन विभाग? @mybmcWardHE कार्यक्षेत्रात प्रभाग क्रमांक ९४ मध्ये इंदिरानगर पोलीस चौकी लगत,खार(पुर्व) मुंबई-५१ येथे निवासी वसाहतीत नियमबाह्य पद्धतीने चार (४) पायांवर उभ्या असलेल्या "पायोनियर" कंपनीचा ४०×४० चौरस फुटांच्या फलकास देण्यात आलेला परवाना तात्काळ रद्द करावा.(चार ऐवजी दोनच पाय दिसावेत या करिता पत्र्याचे आच्छादन करून दोन पाय ह्या जाहिरात कंपनी कडून झाकण्यात आले आहेत) गेली अनेक वर्षे या जाहिरात फलकाची आवश्यक ती दुरुस्ती वा निगा सबंधित जाहिरात कंपनीकडून राखण्यात/ठेवण्यात आलेली नाही ! ही बाब कृपया गांभीर्याने ध्यानी घ्यावी. "मा.आयुक्त-श्री. भूषण गगरानी"@GagraniB यांनी मुंबई "महापालिका सभागृहात" मांडलेल्या "अर्थसंकल्प-२०२६/२७ च्या" वेळी दिनांक २५/०२/२०२६ रोजी ४०×४० आकारमानाच्या चौरस फुट जाहिरात फलकांवर घातलेली बंदी व दिनांक-११/०३/२०२६ रोजी महापालिका उच्च अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी सर्व "जाहिरात फलकांचे सर्वेक्षण" करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत! याचे पालन @mybmcचे अनुद्यापन विभाग करणार का व भविष्यात होणाऱ्या अप्रिय घटनेपासून येथील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणार का? याचे उत्तर मनपा प्रशासनाच्या अनुद्यापन विभागाच्या वतीने तातडीने द्यावे? @mayor_mumbai @TawdeRitu

Governance and accountability Complaint
20 Mar 2026, 2:05 AM