‘एफ दक्षिण’ आणि ‘एफ उत्तर’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवार श्रीमती मानसी मंगेश सातमकर या ८ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्रीमती श्रद्धा श्रीधर जाधव यांना ७ मते मिळाली.
1 reply
राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्षाचे सदस्य या निवडणुकीवेळी अनुपस्थित होते. ‘एफ दक्षिण’आणि ‘एफ उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कामकाज सांभाळले. (२/३)