In reply to
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'सी' विभागाच्या वतीने स. खा. पाटील उद्यान येथे आज शिक्षण विभागातर्फे 'माझी मुंबई' या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली. (१/२)
या ठिकाणी प्रभाग क्रमांक २१८ आणि २२२ च्या नगरसेविका श्रीमती स्नेहल तेंडुलकर व रिटा मकवाना तसेच उपायुक्त (शिक्षण) श्रीमती प्राची जांभेकर या उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नातील मुंबईची अत्यंत सुरेख पद्धतीने चित्रे साकारली आहेत. (२/२) #MyBMCUpdates #MumbaiEducation